सुशिक्षित बेरोजगार 28 जुलैला मेळावा

2

सिंधुदुर्गनगरी ता.२४:सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालच्या ओरोस जैतापकर कॉलनी येथील संपर्क कार्यालयाच्या वतीने २८ जुलै रोजी सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात १८ ते ३५ वयोगटातील अंध,अल्पदृष्टी अंध, कर्णबधीर, मुखबधीर, अस्थिव्यंग जे किमान दहावी ते पदवीधर आहेत. अशांचा समावेश आहे. या मेळाव्यात दिव्यांग बांधवांच्या मुलाखती घेण्यात येणार असून त्यात पात्र ठरणाऱ्यांना तीन महिन्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना नामांकित कंपनीमध्ये नोकरीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक दिव्यांग बांधवांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह आपला पासपोर्ट साईज फोटो घेवून या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल चे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले आहे.

4