खारेपाटण येथे ट्रकमधील डिझेलची चोरी | चंद्रशेखर शिंदे यांची तिघांविरोधात तक्रार

2

कणकवली, ता.२४ खारेपाटण शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसमोर उभ्या केलेल्या ट्रकच्या टाकीमधील 14 हजार रूपयांचे डिझेल चोरीला गेले आहे. या प्रकरणी ट्रक मालक चंद्रशेखर शरद शिंदे (रा.खारेपाटण) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी डिझेल चोरी प्रकरणी धनाजी चव्हाण आणि शांताराम पांचाळ (दोन्ही रा.खारेपाटण) आणि प्रदीप मोरे (भुईबावडा) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
चंद्रशेखर शिंदे यांनी आपल्या ट्रकाची डिझेल टाकी फुल्ल करून नेहमीप्रमाणे जिल्हा बँकेसमोर उभा केला होता. 22 जुलै रोजी सकाळी ते ट्रक चालू करण्यासाठी गेले असता त्यांच्या ट्रकच्या डिझेल टाकीमधील सर्व डिझेल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता 22 रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास धनाजी चव्हाण, शांताराम पांचाळ आणि प्रदीप मोरे यांनी हा प्रकार केल्याची बाब समजली. त्यानंतर शिंदे यांनी या तिघांविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.

1

4