ग्रामविकासच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची २७ रोजी बैठक

2

सिंधुदुर्गनगरी ता.२४:सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या निवृत्ती वेतनाच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. त्यामुळे या सेवानिवृत्त अधिकऱ्यांची संघटना स्थापनेसाठी शनिवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथील ग्रामसेवक भवनात सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी वाय जे फणसळकर व प्रकाश राणे यांनी केले आहे.
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वेतनाच्या अनेक समस्या आहेत. जो तो त्या सोडविण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत असतो. मात्र त्याच्या सरकारी लाल फितीच्या कारभारात एखाद्या एकटयाचा निभाव लागणे कठीण आहे. शिवाय शासनाच्या धोरणाप्रमाणे निवृत्तीवेतनामध्ये वळोवेळी होणारे बदल किंवा महागाई भत्यातील वाढ यांचा सर्वांना मिळण्यासाठी आणि त्यासारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. अनेक संवर्गाच्या संघटना असून त्या आपल्यापरीने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची संघटना नसल्याने त्यांच्या समस्या सोडविताना अडचण निर्माण होत असल्याची माहिती सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी प्रकाश राणे यांनी दिली. तसेच सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या निवृत्ती वेतनाच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. त्यामुळे या सेवानिवृत्त अधिकऱ्यांची संघटना स्थापनेसाठी शनिवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथील ग्रामसेवक भवनात सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी वाय जे फणसळकर व प्रकाश राणे यांनी केले आहे.

1

4