गाड्यांना रिप्लेक्टीव्ह टेप्स लावणे १ ऑगस्ट पासून बंधनकारक

527
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 104 ते 104-डी च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 मानकांची पूर्तता करणारे मान्यता प्राप्त परावर्तक(Reflectors), रिप्लेक्टीव्ह टेप्स(Reflective Tapes) आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट/टेप लावणे बंधनकारक केले आहे. यानुसार परिवहन आयुक्त यांनी सदर नियमाची दिनांक 1 ऑगस्ट 2019 पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्यानुसार दिनांक 1 ऑगस्ट 2019 पासून नवीन वाहन नोंदणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करिता येणाऱ्या वाहनांस AIS 089 व AIS 090 मानकांची पूर्तता करणारे मान्यता प्राप्त परावर्तक (Reflectors), रिप्लेक्टीव्ह टेप्स(Reflective Tapes) आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट/टेप बसविली असल्यास वाहन चाचणी करिता स्विकारण्यात येईल याची सर्व वाहन मालक यांनी नोंद घ्यावी असे सिंधुदुर्ग प्र.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

\