औरंगाबाद गाडी चोरी प्रकरणी सावंतवाडीतील एक ताब्यात…

2

तिघे अटकेत; फायनान्सच्या नावाखाली विकल्या गाड्या…

सावंतवाडी, ता. २४ : औरंगाबाद येथे घडलेल्या चोरीप्रकरणी सावंतवाडीतील संशयितांची चौकशी केल्यानंतर त्यातील एकाला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू असून नंतरच अधिकृत माहिती देऊ,अशी माहिती या गुन्ह्यांच्या तपासी अंमलदारांकडुन देण्यात आली आहे.दरम्यान हा सर्व प्रकार औरंगाबाद येथील दोन बोलेरो पिकप गाड्या चोरी झाल्यामुळे उघड झाला .
यातील तीघे संशयित हे काही दिवस सावंतवाडीत राहायला होते.त्यांनी या ठिकाणी ओळख करून अनेकांना आपल्या बोलण्यात अडकवले होते.आपल्याकडे असलेल्या गाड्या ह्या फायनान्सच्या असून संबंधित गाडी मालकाने वेळेत कर्ज न भरल्यामुळे त्या ओढण्यात आल्या होत्या,असे सांगून त्यांनी त्या गाड्या विकल्या.यातील दोन गाड्या सावंतवाडी येथे खरेदी करण्यात आल्या होत्या.त्याचे रंग बदलण्यात आले होते.
त्यामुळे या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी तेथील पोलिस पथक या ठिकाणी दाखल झाले होते.दरम्यान झालेल्या चौकशीत २० हून अधिक जणांची उलटतपासणी घेण्यात आली.मात्र पोलिसांना योग्य ते पुरावे मिळाले नसल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे.मात्र अधिक तपास करण्यासाठी येथील एकाला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत स्थानिक पोलिसांनी मात्र कमालीची गुप्तता पाळली आहे.

4