Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याउभांदाडा गावात मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड रुग्ण

उभांदाडा गावात मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड रुग्ण

आरोग्य यंत्रणा सतर्कतेसाठी शिवसेनेकडून निवेदन

वेंगुर्ले, ता. २४ : गेले १५ ते २०दिवस तालुक्यातील उभादांडा गावात मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, रुग्ण आढळले असून काही रुग्ण ग्रामीण रुग्णालयात ,तर काही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तरी आरोग्य विभागाने वेळीच दक्षता घेऊन उपाय योजना राबवावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी माईणकर यांच्याकडे निवरडनाद्वारे शिवसेनेने केली आहे.
बदलत्या वातावरणामुळे उभादांडा परिसरात तापसरीच्या साथी पसरल्या आहेत. त्यामुळे गावात आपल्या आरोग्य यंत्रणेध्दारे साथी व रोगराईची माहिती घेऊन औषध पुरवठा करण्या बाबत हे निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांच्यासह शिवसेनेच्या तालुका महिला प्रमुख -सौ,सुकन्या नरसुलै, उपतालुका प्रमुख-संजय गावडे, ग्रा सदस्य-गणेश चेदवणकर, ग्रा सदस्य-सायली आडारकर, वेंगुर्ला शहर महिला प्रमुख-मंजुषा आरोलकर, ग्रा सदस्य-अपेक्षा बागायतकर, ग्रा सदस्य-सभाजी भुते, ग्रा सदस्य -दयानंद खर्डे, शाखा प्रमुख-दयानंद जुवलेकर, नितिश कुडतरकर, प्रभाकर गावडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments