भगदाड पडलेल्या रस्त्याची अखेर दुरुस्ती…

252
2
Google search engine
Google search engine
Google search engine

स्थानिकांनी वेधले होते नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष…

मालवण, ता. २४ : शहरातील माघी गणेश चौक मार्गावरील रस्ता खचून भगदाड पडले. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या रस्त्यावर अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तत्काळ पालिका प्रशासनास याची माहिती दिली. त्यानुसार आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत यांच्या सूचनेनुसार पालिका कर्मचारी व भुयारी गटार योजनेच्या कर्मचार्‍यांनी रस्त्यावरील भगदाड बुजवत सिमेंट काँक्रीटने रस्ता पूर्ववत केला.
यावेळी पालिका कर्मचारी राजा केरीपाळे, रमेश कोकरे, किशोर तळाशिलकर, महेश हडकर तसेच भुयारी गटार योजनेचे कर्मचारी उपस्थित होते.
भुयारी गटार योजनेच्या चेंबर ठिकाणी रस्ता खचला असल्याने पुन्हा कोणत्याही मार्गावर अशी स्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना नगरसेवक खोत यांनी भुयारी गटाराच्या कर्मचार्‍यांना दिल्या. सर्व मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करा असे आदेश नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी कर्मचार्‍यांना दिले.
यावेळी रुजाय फर्नांडिस, आनंद आचरेकर, बस्त्याव डिसोझा, सुधाकर परब, पप्या कांदळकर, सुलू कांदळकर, देवेंद्र मयेकर, मनोज शिरोडकर, अल्पेश वराडकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

\