मालवण पालिकेच्या मुख्याधिकारीपदी जयंत जावडेकर यांची नियुक्ती…

2

मुख्याधिकारी रंजना गगे यांची प्रशासकीय बदली…

मालवण, ता. २४ : येथील पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रंजना गगे यांची प्रशासकीय बदली झाली असून त्यांच्या जागी सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ जुलैला पदभार स्वीकारण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
पालिकेच्या मुख्याधिकारी गगे यांनी गेली तीन वर्षे पालिकेचे कामकाज चांगल्यारितीने सांभाळले. पदोन्नतीने त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जावडेकर यांची नियुक्ती झाली आहे. उद्या ते या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
शहरात सीआरझेड, रस्ता रुंदीकरण, शहर विकास आराखडा, भुयारी गटार योजना, डास निर्मूलन यांसारख्या समस्या भेडसावत असून हे प्रश्न सोडविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

23

4