व्यापाराच्या लूट प्रकरणी गोवा पोलिसाला अटक

279
2

सावंतवाडी पोलिसांची कारवाई: आंबोली घाटात घडला होता प्रकार

सावंतवाडी ता.२५: औषध व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी गोवा राज्यातील पोलिस कर्मचार्याला अटक केली आहे.निलेश नंदकुमार नाईक रा.कासार पाल डिचोली असे त्याचे नाव आहे.यापूर्वी या गुन्ह्यात तब्बल पाच जणांना अटक करण्यात आली होती.

गोवा ते इचलकरंजी असा प्रवास करणाऱ्या उमेश पीसे नामक व्यापाऱ्याला या टोळक्याने लुटले होते.यातील काहींना पकडण्यास पोलिसांना यापूर्वीच यश आले होते.यात अन्य सहकारी गोव्याचे असले तरी सावंतवाडीतील एका युवकाचा समावेश असल्याचे समजते, दरम्यान आज याप्रकरणी चक्क पोलिसाला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.आज त्याला  येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

4