सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिकारी पदी संतोष निडगे

2

आज स्विकारणार कार्यभार :जावडेकर यांची मालवणला बदली …

सावंतवाडी, ता.२५: येथील पालिकेच्या मुख्याधिकारी पदी जिल्हा पालिका प्रशासन अधिकारी म्हणून जबाबदारी बजावत असलेल्या संतोष निडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याठिकाणी कार्यरत असलेले जयंत जावडेकर यांची मालवण मध्ये बदली करण्यात आली आहे.
श्री निडगे आज आपला कार्यभार स्वीकारतील अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.सात ते आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी श्री जावडेकर यांना नियुक्ती देण्यात आली होती मात्र त्यांची बदली मालवणी येथे करून याठिकाणी निडगे यांना संधी देण्यात आली आहे.
श्री निडगे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही नगरपालिकांचा मुख्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळला आहे.

7

4