संजय कांबळे:तक्रार निवारण समिती गठीत केल्याची माहीती
दोडामार्ग/सुमीत दळवी,ता.२५: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही किंवा अडचणी असल्यास लेखी तक्रारी दोडामार्ग सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर कराव्यात असे आवाहन निवेदनाद्वारे सहाय्यक निबंधक संजय कांबळे यांनी केले आहे.लाभार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या लाभाबाबत काही शेतकरी वंचित राहिले आहे अशा तक्रारी शासनाकडे तसेच सहकारी विभागाचे विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहे. या योजनेच्या लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने पुरवठा केला जात नाही अशाही तक्रारी येत आहे.व प्राप्त झाल्या आहे.मुळात अपुरी चुकिची माहिती इत्यादी कारणाने प्रकिया करणे शक्य होत नाही .त्यामळे यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार पणन न वस्त्रोद्योग विभागाकडील शासन निर्णयानुसार तक्रारी निवारणासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तालुका पातळीवर अशा समिती गठीत करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष संबंधित तालुका तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे आहेत.तर समिती सदस्य म्हणून जिल्हा मध्यवर्ती. बँकेचे तालुका विकास अधिकारी आणि संबंधित तालुका लेखापरीक्षक आहेत.सचिव म्हणून संबंधित कार्यालयाचे सहकारी अधिकारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ या योजनेच्या लाभार्थि संदर्भात काही तक्रारी असल्यास किवा योजनेचा लाभ मिळाला नाही अशा प्रात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दोडामार्ग यांचे कार्यालयाकडे लेखी तक्रारी सादर करून पुढिल सभेत आवश्यक त्या कागदापत्रासह उपस्थित राहावे. असे आवाहन दोडामार्ग सहाय्यक निबंधक श्री संजय कांबळे यांनी केले आहे.