आंबोलीत रंगणार उद्या चिखल महोत्सव

2

आंबोली टूरीझमचे आयोजन: शेतावरची मजा अनुभवता येणार

आंबोली ता.२५: वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना उद्या चिखल महोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.आंबोली टुरिझमच्या माध्यमातून संस्थापक निर्णय राऊत यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा महोत्सव उद्या होणार आहे.
आंबोलीचा पर्यटनदृष्ट्या दिवसेंदिवस विकास होत आहे या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी येणाऱ्या हजारो पर्यटकांना या महोत्सवामुळे आगळावेगळा आनंद घेता येणार आहे.
आंबोली टुरिझमच्या माध्यमातून आंबोली येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात यात नाहीत रायडिंग, जंगल सफर,पर्यटन आदी विविध प्रकारांबरोबर आंबोलीतील प्रसिद्ध धबधबा पाहण्याची संधी देण्यात येते मात्र यावर्षी राऊत यांच्या संकल्पनेतून आगळ्यावेगळा चिखल महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी नऊ ते दुपारी एक या काळात हा महोत्सव होणार आहे. संबंधित सहभागी होणाऱ्या पर्यटकांना शेतातील लावणी, शेतकरी जीवनाचे शिक्षण आणि मस्ती असा आगळावेगळी मज्जा अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर गावरान मालवणी पद्धतीचा नाष्टा चटणी-भाकरी आधी जेवण सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री निर्णय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे.

20

4