सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने २७ जुलैला सावंतवाडीत मार्गदर्शन शिबिर…

221
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दहावीतील गुणवंतांचा गौरव:विविध उपक्रमांचे आयोजन…

सावंतवाडी ता.२५: येथे आयोजित करण्यात आलेल्या सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सवानिमित्त तालुक्यातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.त्याचबरोबर दहावीनंतर पुढे काय ? या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम २७ जुलैला येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजमध्ये सकाळी 11 वा.संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी उपस्थित राहणार आहेत.या महोत्सवात १८ ऑगस्ट पर्यंत वकृत्व चित्रकला सायकल रॅली पर्यावरण वृक्ष वाटप मार्गदर्शन रानभाजी स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजू परब संजू परब व संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली गेली तीन वर्ष सातत्याने मान्सून महोत्सव फाउंडेशन च्या वतीने घेण्यात येत आहे यंदा सलग वीस दिवस विविध कार्यक्रम करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा महोत्सव होणार आहे सावंतवाडी तालुक्यातील दहावीतील ८५% गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे तसेच त्यांच्या भविष्यातील वेध या विषयावर प्रसिद्ध वक्ते डॉक्टर आदित्य ट डल यांच्या व्याख्यान ठेवण्यात आले आहे २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ग्रामीण भागात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत १० ऑगस्टला कलंबिस्त सावरवाड शाळेत पर्यावरण विषयक मार्गदर्शन व वृक्ष वाटप कार्यक्रम होणार आहे रविवारी ११ ऑगस्टला पाककला स्पर्धा सावंतवाडी येथे तर १३ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता महिलांची सायकल रॅली शहरातून काढण्यात येणार आहे १७ ऑगस्टला वकृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले या तीन तालुक्यातील मुलांसाठीच ही स्पर्धा आहे तीन गटात स्पर्धा होणार असून पहिला गट तिसरी ते चौथी पाचवी विषय विषय छत्रपती शिवाजी महाराज २ झाडे लावा झाडे जगवा चार मिनिटे दुसरा गट सहावी ते आठवी वेळ पाच मिनिटे एक शिस्तीचे महत्व दोन सुदृढ शरीर हाच खरा दागिना तिसरा गट नववी ते दहावी वेळ सहा मिनिटे स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो शकते दोन मोबाईल आणि इंटरनेट यू ग प्रथम पारितोषिक १०००दुतीय ७५१ तृतीया ५०१ व प्रमाणपत्र व प्रमाणपत्र तरी ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे ९४२२५८४४३० सहसचिव परलाद तावडे सैनिक पतसंस्था सावंतवाडी व केंद्र प्रमुखांकडे नोंदवावीत येत्या दहा ऑगस्ट पर्यंत नावे नोंदवावी प्रत्येक शाळेतून गटा मागे दोन ते मुले सहभाग घेऊ शकतात १८ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे तरी स्पर्धकाने यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेचे सचिव एडवोकेट संतोष सावंत यांनी केले आहे

\