‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ २८ जानेवारी पर्यंत…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.२४: ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन लेखक सतिश लळीत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ग्रंथप्रदर्शन दि.२३ जानेवारी पासून (सार्वजनिक सुट्टी वगळता) दि.२८ जानेवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाचक सभासद यांनी ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन बा. हजारे यांनी केले आहे.

27

4