राज्यातील सेवा समाप्त ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा सेवेत सामावून घेणार…

2

राष्ट्रीय आरोग्य सेवा संचालक आयुक्तांचे आदेश; जिल्ह्यातील १२ आरोग्य सेविकांना दिलासा…

सिंधुदुर्गनगरी,ता.२४: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील सेवा समाप्त केलेल्या ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे
असे आदेश आयुक्त राष्ट्रीयआरोग्य सेवा संचालक यांनी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्यायग्रस्त १९ आरोग्य सेविकांना अखेर दिलासा मिळाला असून त्याना जिल्हा परिषद प्रशासना कडून आज नियुक्ती पत्र देण्यात आली.

राष्ट्रीयआरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्रामध्ये प्रसुती कार्यक्रमात सहभाग न घेतलेल्याच्या कारणाखाली आरोग्य सेविकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त मार्फत दिले होते, त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांना पदमुक्त करण्यात आले होते, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० आरोग्य सेविकांचा समावेश होता त्यातील एका आरोग्यसेविकेला समायोजनात संधी मिळाल्यामुळे १९ आरोग्य सेविकांनी आपल्याला फेर नियुक्ती मिळावी यासाठी आंदोलन सुरु केले होते. आपल्याला गेली अनेक वर्षे काम करून ही उपकेंद्रामध्ये प्रसुती कार्यक्रमास सहभाग न घेतल्याच्या कारणाखाली पदमुक्ती करण्याच्या शासनाच्या आदेशावर आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती.

याबाबत आरोग्य आयुक्तानी राज्यातील सेवा समाप्त झालेल्या आरोग्य सेविकांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबत केंद्र सरकार आयुक्त आरोग्य विभाग संचालक राष्टीय आरोग्य अभियान यांनी २० जानेवारी २०२३ रोजी मान्यता दिली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील ५९७ आरोग्य सेविकांना यापूर्वी त्यांनी काम केलेल्या पदावर त्याच ठिकाणी सामावून घ्यावे जर पद सामावून घेऊन रिक्त राहिलेली आरोग्य सेविका असतील तर याबाबत शासनाकडे अहवाल सादर करावा. जेणेकरून नव्याने होणाऱ्या भरतीत त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे.
त्या नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदमुक्त केलेल्या १९ आरोग्य सेविकांना जि .प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज नियुक्ती पत्र देत सर्वाना सेवेत पुन्हा सामाऊन घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा आरोग्य यंत्रणेला बळ मिळाले आहे.तर याबाबत आरोग्य सेविकानी समाधान व्यक्त केले आहे.

74

4