अमरजित सिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सायन संघाची बाजी…

2

चार गडी राखत मालवण संघाचा केला पराभव ; अ. शि. देसाई टोपीवाले शिल्ड क्रिकेट स्पर्धा…

मालवण, ता. २४ : टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित अनंत शिवाजी देसाई टोपीवाले शिल्ड लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अमरजित सिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सायन संघाने १७८ धावांचे उद्दिष्ट गाठत चार गडी राखून मालवण संघाचा पराभव केला.
आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीएसए मालवण संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१ षटकात सर्व गडी गमावून १७७ धावा फटकावल्या. यात प्रकाश सावंतने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या तर यश धुरीने ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावांचे योगदान दिले. सायन संघाच्या अमरजित सिंगने भेदक गोलंदाजी करताना ३९ धावांत ४ गडी बाद केले. ओंकार जाईलकर, राज पोर्णक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
१७८ धावांचे उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या सायन संघाने संयमाने फलंदाजी करताना ३३ षटकातच सहा गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावा करत विजय मिळविला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अमरजित सिंगने नाबाद २६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला देवांग गुप्ता २८ धावा, आकाश संगळे २१ धावा यांची साथ लाभली. मालवण संघाच्या अभिषेक कांदळगावकर याने ३७ धावा देत ३ बळी मिळविले. अन्य गोलंदाज आपला प्रभाव टाकू शकले नाहीत.

4