भराडी देवीच्या यात्रेस यावर्षी रेकॉर्डब्रेक गर्दी होईल…

2

यात्रेच्या पार्श्वभूमीवर राऊत, नाईक यांच्याकडून आढावा ; मंडळास आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही…

मालवण, ता. २४ : भराडी देवीची यात्रा मागील तीन वर्षां नंतर होणारी सर्वात मोठी यात्रा आहे. भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी यावर्षी यात्रेत होणार आहे. भाविकांना सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी आंगणेवाडी मंडळास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आंगणेवाडी येथे दिली.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज आंगणेवाडी येथे भेट देऊन भराडी देवीचे दर्शन घेतले तसेच यात्रा तयारीची माहिती आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे व पदाधिकारी आंगणे कुटुंबीय यांच्याकडून घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपतालुका प्रमुख अमित भोगले, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, मर्डे उपसरपंच पिंट्या गावकर, बंडू चव्हाण, अरुण लाड, सुभाष धुरी, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, विजय पालव, नंदकिशोर कासले, मुळीक यासह अन्य पदाधिकारी व आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावर्षी यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. रस्ते, पाणी, वीज पुरवठा, बीएसनल नेटवर्क, आरोग्य सुविधा व अन्य सोई सुविधा मंडळाच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून देत असताना काही समस्या असतील तर त्या मंडळ व प्रशासन दूर करत आहे. आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली.

आमच्या सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आंगणेवाडी भराडी देवी आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण व शिवसैनिक आंगणेवाडी यात्रेस येणार आहेत. भराडी मातेने सर्वाना निरोगी दिर्घयुष्य देवो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो. अशी प्रार्थना भराडी देवीच्या चरणी करण्यात आली असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

187

4