शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे काम अखेर सुरू…

2

बांदा,ता.२९: शेर्ले-निगुडे-सोनुर्ली या रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनसेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सार्वजनिक बांधकामला इशारा दिला होता.

शेर्ला-निगुडे सोनुर्ली या ठिकाणी मोरींना (पुल) पाईप घालण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले या कामाची पाहणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली. संबंधित ठेकेदाराला काम सुस्थितीत व उत्तम दर्जाचे झाले पाहिजे, अशा सूचन केल्या. तसेच शेर्ला-कापईवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले.

4