पोलिस, डॉक्टर “सिम्बॉल” लावून फिरणार्‍या एकाला सावंतवाडी पोलिसांचा दणका…

2

वाहतूक पोलिसांच्या जागरुकीमुळे प्रकार उघड; दंडात्मक कारवाई करण्याच्या निरीक्षकांच्या सुचना…

सावंतवाडी,ता.३०: खासगी कारवर पोलिस, डॉक्टर असे “सिम्बॉल” लावून फिरणार्‍या एकावर आज सावंतवाडी पोलिसांकडुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा प्रकार वाहतूक पोलिस राजा राणे व सुनिल नाईक यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान मी स्वतः पोलिस अधिकारी असताना गाडीवर पोलिस लिहीत नाही. मग तुमच्याकडुन असे प्रकार होत असतील तर चूकीचे आहेत, असे सांगून प्रभारी पोलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी नाराजी व्यक्त केली. व संबधिताला समज देवून कारवाईच्या सूचना दिल्या.

436

4