सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे “हिंदु राष्ट्र-जागृती” सभेला उस्फूर्त प्रतिसाद…

2

वेंगुर्ले ता. ३०: कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर का कारवाई होत नाही ? राजस्थानमधील कन्हैयालालच्या हत्येच्या कटात ‘दावत ए इस्लामी’ या संघटनेचा हात आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने तिच्या अन्वेषण अहवालात म्हटले आहे. ‘दावत ए इस्लामी’ या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.
कुडाळ – शहरातील कुडाळ हास्कूलच्या पटांगणावर हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. सभेच्या प्रारंभी शंखनाद, त्यानंतर सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. आनंद मोंडकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी करून दिली. त्यानंतर मान्यवर वक्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.
*बहुसंख्य हिंदूंच्या भारतात सनातन हिंदु धर्माचा आदर करून कायदे बनवले पाहिजेत ! – सद्गुरु स्वाती खाडये* : या वेळी सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण ताठ मानेने जगतो आहोत; म्हणून तो इतिहास विसरून चालणार नाही. बहुसंख्येने असलेल्या हिंदूंच्या भारतात सनातन हिंदु धर्माचा आदर करून कायदे बनवले गेले पाहिजेत. सेक्युलर व्यवस्थेला पर्याय म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल. हे करण्यासाठी शिवाजी महाराजांप्रमाणे साधनाही केली पाहिजे. वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘सनातन हिंदु धर्म हा हिंदु राष्ट्राचा प्राण आहे. अनादि काळापासून सनातन हिंदु धर्मातील सिद्धांतानुसारच भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज देशात निधर्मीपणाचा (‘सेक्युलर’पणाचा) गवगवा होत आहे; पण या ‘सेक्युलर व्यवस्थेमुळे हिंदु पिढी उद्ध्वस्त होत आहे. धर्म विसरल्यामुळे विविध प्रकारच्या जिहादांना हिंदू बळी पडत आहेत. हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आज चित्रपटांतून हिंदूंच्या देवीदेवतांची विटंबना केली जाते. हे करतांना त्यांना भीती वाटत नाही; कारण त्यांना माहिती आहे की, हिंदू स्वतःचे कुटुंब, स्वतःचा व्यवसाय यात गुरफटलेले आहेत. त्यांच्यामध्ये धर्माभिमान राहिलेला नाही. ही स्थिती आपल्याला पालटायची आहे; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी आवाज बुलंद करायचा आहे. अशा सभांच्या माध्यमातून हिंदूंना जागृत करायचे आहे.’’
*लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद आदी देशविरोधी कृत्यांच्या विरोधात सिंधुदुर्गात महाआंदोलन उभारणार ! – श्री. मनोज खाडये* : सिंधुदुर्ग जिल्ह्याला ख्रिस्ती मिशनरींकडून धर्मांतराचे केंद्र बनवले जात आहे. लव्ह जिहाद, पाकिस्तानशी संबंधित संघटनांचे कार्य, हलाल प्रमाणपत्र अशा देशविरोधी कृत्यांच्या विरोधात जिल्ह्यात येत्या आठवड्याभरात महाआंदोलन उभे केले जाणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले.
या वेळी पुढे ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद, लँड जिहाद पोचला आहे. देवगड, वेंगुर्ले, मालवण येथील समुद्रकिनारपट्टीवर महसूलच्या नोंदी तपासल्या, तर आपणास (लँड जिहादच्या माध्यमातून) घेरले जात असल्याचे लक्षात येईल. हिंदूंनी सजग झाले पाहिजे. हिंदूंवरील अन्याय, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात राज्यातील १७ जिल्ह्यांत जनआक्रोश मोर्चे काढले गेले. लाखोंच्या संख्येने हिंदु एकत्र आले. ही सभा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला समर्थन देणारी आहे. आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करावा लागणार. वर्ष २०२५ मध्ये केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राची पायाभरणी केली जाणार आहे.
तर यावेळी बोलताना अधिवक्ता (ॲड्.) सांगोलकर पुढे म्हणाले की, ‘‘प्रभु श्रीरामचंद्रांच्या हिंदु राज्याची, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची आम्ही मागणी करत आहोत. आताच्या वेळकाढू न्याययंत्रणेनुसार नव्हे, तर छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासारखी न्याययंत्रणा हिंदु राष्ट्रात असेल. ‘देशात सर्वधर्मसमभाव आहे’, असे म्हटले जाते, तर मग संपूर्ण भारतात आज केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का केले जाते ? ख्रिस्त्यांसाठी डायोसेसन संस्था आणि मुसलमानांसाठी वक्फ बोर्ड आहे, तर मग कायदे फक्त हिंदूंसाठीच आहेत का ? सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण झाले. मग मंदिर सरकारीकरणातून कसा भ्रष्टाचार होतो? हे हिंदु विधीज्ञ परिषदेने अनेक घोटाळ्यांद्वारे उघड केले. मंदिरांची अनेक एकर भूमी परत मिळवून दिली आहे. सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणारे कुडाळ हायस्कूलचे प्रशासन, कुडाळ पोलीस ठाणे, कुडाळ नगरपंचायत, तसेच पत्रकार यांचे या वेळी आभार मानण्यात आले.

174

4