दोडामार्गात चिखल अंगावर ओतून आत्मक्लेश आंदोलन

755
2

रस्त्याच्या कामावर लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थां कडून अनोखा पर्याय

दोडामार्ग – सुमित दळवी दोडामार्ग बांदा या रस्त्याला खड्डेमय करण्यासाठी जबाबदार ठरणाऱ्या जीवन प्राधिकरणसह बांधकामच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आज दोडामार्ग येथील महाराष्ट्र स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. यात एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करून आत्मक्लेश करण्यात आला.तसेच शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, पराग गावकर, पुरुषोत्तम देसाई,संजय कुळणेकर,आशिष सावंत, मनोज सावंत, सरिता वाघाटे, भरत वाघाटे, देवेंद्र सावंत, रघुनाथ नाईक, सखुबाई यादव, विनिता वाघाडे, विजय केळकर आदी उपस्थित होते.
प्राधिकरणाच्या माध्यमातून मणेरी येथून तिलारीचे पाणी सासोली बांदा मार्गे वेंगुर्ला व जिल्ह्यातील इतर ठिकाणी नेले जात आहे. यासाठी पाईपलाईनचे काम उन्हाळ्यात सुरू होते. यासाठी रस्त्याची साईड पट्टी खोदून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु ठेकेदाराने साईडपट्टी व्यवस्थित न बुजवल्याने आता पावसात साईडपट्टी खचून अपघात होताना दिसत आहेत. याबाबत बांधकाम विभाग व प्राधिकरण विभाग यांना वारंवार निवेदने देऊनही कोणीही या प्रश्नाकडे लक्ष देताना दिसत नाही. आज कळणे येथे फोंडीयेकडे जाणाऱ्या पुलानजीक रस्ता खचल्याने त्याठिकाणी तसेच माजी जि.प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व महिलांनी आत्मक्लेश चिखलफेक आंदोलन केले.

4