पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन…
कुडाळ ता.२५: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित व आमदार वैभव नाईक यांच्या सौजन्याने येथील सिद्धिविनायक हॉल,रेल्वेस्टेशन रोड येथे
आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव २६ ते २८ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे.
. या महोत्सवाचे उदघाटन उद्या २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जि.प.सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, राजू कविटकर, वर्षा कुडाळकर, अनुप्रीती खोचरे ,सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,संतोष शिरसाट, अभय शिरसाट, मंदार शिरसाट अतुल बंगे, संजय भोगटे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आषाढी महोत्सवानिमित्त शुक्रवार दि. २६ जुलै रोजी संयुक्त दशावतार महान पौराणिक महानाट्य मयूरध्वज सत्वपरीक्षा,हे नाटक सादर होणार आहे.तर दुसऱ्या दिवशी शनिवार दि.२७ जुलै रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त दशावतार महान पौराणिक महानाट्य “वत्सला हरण’ सादर होणार आहे.तसेच जिल्ह्यातील जेष्ठ दशावतारी कलाकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
रविवार २८ जुलै रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी महोत्सवाची सांगता,तिरंगी भजनांच्या जंगी सामन्याने होणार आहे.हा भजनांचा सामना घोटगे श्री.लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विनोद चव्हाण,नाडण श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे,व श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत यांच्यात होणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख,नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, पं. स. सदस्य, सरपंच, व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,तसेच नाट्य व भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.