महिलांसाठी आयोजित मोफत फॅशन डिझाइनिंग कोर्सचा समारोप…
वेंगुर्ले, ता. २५’ माजी आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका भाजपच्यावतीने म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील महिलांसाठी मोफत फॅशन डिझाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले होते.म्हापण येथील सिद्धी गेस्ट हाऊस येथे तीन दिवस सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिराचा आज २५ जुलैला समारोप करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच अभय ठाकूर व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री.तेली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई ,उपसरपंच अशोक पाटकर , जि.का.का.सदस्य विकास गवंडे , उमा फॅशन इनस्टीस्टुसच्या सौ उमा म्हारदळकर ,ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद चव्हाण , महिला ता. उपाध्यक्षा ऋतुजा मेस्त्री , शक्ती केंद्र प्रमुख संजय परब , जेष्ठ पदाधिकारी संजय ठाकुर , अनु. मोर्चाचे कीरण चव्हाण , मकरंद रावले , प्रदिप गवंडे , प्रभाकर तेली , महिला शक्ती केंद्र प्रमुख प्रगती राऊळ , मेथर मॅडम , कीर्ती मंगल भगत इत्यादी उपस्थित होते.