दुकानवाडमध्ये वाहून जाणाऱ्या दुचाकी चालकाला वाचवले

2

माणगाव खो-यातील घटना : पुल पाण्याखाली गेल्याने घडली घटना

कुडाळ / मिलिंद धुरी, ता. २५ : पाण्याचा अंदाज न आल्यामुळे माणगाव खोऱ्यातील दुकान वाट पुलावरून आज दुचाकीसह चालक वाहून गेला. ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्यात सहभाग घेऊन त्या दुचाकीचालक आला वाचवण्यास यश मिळवले. काशी कविटकर (वय 30, रा. उपवडे) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. संबंधित पूल हे रस्त्यापासून सखल भागात असल्यामुळे कविटकर यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वारंग व त्या ठिकाणी जमलेल्या अन्य ग्रामस्थांनी मदत केली.

 

 

9

4