सावंतवाडी ता.२५: औषध व्यापारी लुट प्रकरणी गोवा राज्यातील पोलीस कर्मचारी नितेश नंदकुमार नाईक रा.डिंचोली याला आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.काल रात्री उशिरा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला अटक केली होती.दरम्यान यापूर्वी या गुन्ह्यात तब्बल पाच जणांना अटक करण्यात आली होती.
गोवा ते इचलकरंजी असा प्रवास करणाऱ्या उमेश पीसे नामक व्यापाऱ्याला या टोळक्याने लुटले होते.यातील काहींना पकडण्यास पोलिसांना यापूर्वीच यश आले होते.यात अन्य सहकारी गोव्याचे असले तरी सावंतवाडीतील एका युवकाचा समावेश असल्याचे समोर आले होते.तर आज याप्रकरणी चक्क पोलिसालाच अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती.दरम्यान त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी गोवा पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस कोठडी
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES