दोडामार्ग, ता. २५ : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त साटेली-भेडशी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, उपसरपंच सुर्यकांत धर्णे, यशवंत आठलेकर, चंद्रकांत मळीक, सुधीर दळवी, दिप्ती मयेकर, रमाकांत तळकटकर, वासुदेव राऊळ, स्मिता आठलेकर, वनिता राऊळ, उमेश सावंत, सुदन चौलेकर, संजय उसपकर, रवी धर्णे, सतीश मयेकर, अशोक धर्णे, विष्णू सुतार, राजाराम डिंगणेकर, अजय दळवी, विनोद बिर्जे, संजय आरोसकर आदी उपस्थित होते.
या शिबीरात नेत्रतज्ञ, मधुमेह तज्ञ, हृदयरोगतज्ञ अशा डॉक्टरांनी आपली सेवा दिली. रविवारी 28 जुलैला ग्रामीण रुग्णालय आणि 31 तारखेला तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबीर पुन्हा होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केले आहे.
दोडामार्ग येथे आयोजित आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES