पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी स्विकारला पदभार… नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले स्वागत…

2

मालवण, ता. २५ : येथील पालिकेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून जयंत जावडेकर यांनी आज पदभार स्विकारला. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी त्यांचे स्वागत केले.
पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्याजागी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी आवेक्षक सुधाकर पाटकर, कार्यालय निरीक्षक श्री. गावीत आदी उपस्थित होते.

3

4