Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनआमदार वैभव नाईक मंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा...

आमदार वैभव नाईक मंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा…

 

सुचिता चिंदरकर ; आंबडोस उपसरपंचासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

  • मालवण, ता. २५ : आमदार वैभव नाईक पुन्हा आमदारच नव्हे तर मंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा आहे. मात्र गाफील राहू नका, स्वतः निवडणूक लढवीत असल्याचे समजून जोमाने कामाला लागा. विधानसभेवर भगवाच फडकणार. मात्र कोकणातून आमदार नाईक मंत्री होण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असे आवाहन कुडाळ मालवणच्या संपर्कप्रमुख सुचिता चिंदरकर यांनी आंबडोस येथे केले.
    आंबडोस गावातील उपसरपंच भारती आयरे व अनेक ग्रामस्थांनी सुचिता चिंदरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, श्वेता सावंत, बाळ महाभोज, अमित भोगले, विजय पालव, विशाल धुरी, उदय गावडे, प्रशांत भोजने, भाऊ लाड यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
    आमदार नाईक म्हणाले, ज्या आंबडोस गावात शिवसेनेला जागा नव्हती त्याच आंबडोस गावातील शेकडो ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यस्तरावर शिवसेनेत प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत असून त्याच धर्तीवर गावागावात शिवसेनेत प्रवेश होत आहेत. मात्र कोणतेही आमिष दाखवून निवडणुकीच्या तोंडावर हे प्रवेश घेतले जात नाहीत तर प्रत्येक प्रवेशकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातील हा विश्वास आम्ही त्यांना देत आहोत. राज्यात पुन्हा शिवसेना- भाजपाचीच सत्ता येणार आहे आणि या मतदारसंघात २०१४ ला तुम्ही इतिहास घडवला आता पुन्हा मोठा इतिहास घडविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.
    यावेळी उपसरपंच आयरे यांच्यासह ग्रामस्थ पुंडलिक कदम, शशिकांत कदम, बाळकृष्ण आयरे, आत्माराम कदम, एकनाथ कदम, अनंत कदम, विजय कदम, विश्वनाथ कदम, अमित आयरे, सतीश कदम, संजय कदम, संतोष कदम, कृष्णा कदम, गोपाळ कदम, सखाराम कदम, प्रकाश कदम, महेश शेलार यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments