आनंददायी शिक्षणातून ज्ञान समृद्धी

162
2

रोटरी क्लब आँँफ वेंगुर्लेचा विविध शाळांमध्ये उपक्रम

वेंगुर्ले,ता.२५ : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊनच्यावतीने टिच विन्स प्रोजेक्ट अंतर्गत  विविध शाळांमध्ये “आनंददायी शिक्षणातून ज्ञान समृद्धी ” उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश घाटवळ यांनी दिली.
डिस्ट्रिक्ट ३१७० चे अँँडाॅप्शन अँँण्ड हॅपी स्कुल आरडीसी आँफीसर रो. संजय पुनाळेकर, वेंगुर्ला मिड टाऊन टिच विन्स चेअरमन रो.राजन गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रोजेक्ट आयोजित करण्यात येत आहे.
या”टिच विन्स प्रोजेक्ट “आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रोटेरीयन प्रा.वसंतराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली  जि.प.शाळा नं.४ मध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुलभूत गणित, विज्ञान विषयक जाणिवा विकास समृद्धीसाठी  विज्ञान, गणित घटकांचे प्रात्यक्षिक द्वारे -कृतीयुक्त  अध्ययनात  प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमात  तृतीय वर्ष विज्ञान विभागाचे विद्यार्थी प्रितेश लाड, साहिली निनावे सहभागी झाले आहेत.

4