माणगाव मध्ये रंगलेल्या चोर-पोलिसांच्या खेळाचा अखेर छडा लागला

2

“त्या” गाड्या दारू वाहतूक करणा-याच: राज्य उत्पादन शुल्क कडून एक जण ताब्यात

कुडाळ ता.२५: माणगाव येथील बाजारपेठेत भरधाव वेगाने दारू घेऊन जाणाऱ्या त्या घटनेचा अखेर छडा लागला आहे. त्या गाडीतून दारू वाहतूक होत होती आणि त्या गाडीचा पाठलाग करणारे राज्य उत्पादन शुल्क चे पथक होते अशी माहिती पुढे आली. मात्र ग्रामस्थांचे म्हणणे त्या तीन गाड्या होत्या असे असले तरी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. परंतु या कारवाईबाबत अधिकारी सुशेगात होते. याबाबत माणगाव येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ब्रेकिंग मालवणी कडून माणगाव भर बाजारात रंगला चोर-पोलिसांचा खेळ असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
त्यानंतर मोठी खळबळ माजली होती. परंतु काल सायंकाळी केलेल्या कारवाई ची माहिती आज रात्री उशिरा संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मीडियाला दिली. यात गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील तुषार तुळसकर(वय २१) नामक युवकाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडे असलेली सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली. ही कारवाई कुडाळ पथकाचे प्रभारी निरीक्षक एन.पी. रोठे सी.डी. पवार,वाहन चालक एच आर वस्त, प्रसाद माळी, विजय राऊळ, प्रशांत परब अवधूत सावंत, यांनी केली अधिक तपास प्रभारी निरीक्षक रोठे करीत आहेत.

20

4