दोडामार्ग – प्रतिनिधी
येथील भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष योगेश महाले यांनी आज राजीनामा तालुकाध्यक्ष यांच्याकड़े दिला आहे.
गेल्या काही वर्षा पासुन महाले यांनी शहराध्यक्ष म्हणून आपली कामगिरी निभावली आहे. आज दिलेल्या राजीनाम्यात महाले यांनी म्हटले की मी माझा वैयक्तिक कारणास्त्व मी राजीनामा देत आहे.मात्र जरी राजीनामा दिला तरी मी भारतीय जनता पार्टिचाच कार्यकर्ता म्हणून राहणार आल्याचे त्यांनी म्हटले आहे
आता दोडामार्ग शहराचा नवीन शहराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. असे असले तरी महाले यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वैयक्तिक कारणास्त्व दिला की त्याला इतर कारणे आहेत असा विषय चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.