शिरोडा मोबाईल चोरीतील संशयित अल्पवयीन युवक

2

 

५० हजार रुपयांचे साहित्य जप्त:स्वाभिमान पक्षाने आंदोलन स्थगित करण्यासाठी पोलिसांचे पत्र

वेंगुर्ले : ता.२६
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल शिरोडा मोबाईल शॉपी चोरीच्या गुह्याखाली सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एक १६ वर्षीय विधी संघर्ष बालकाला बालकल्याण समिती उमरखडी डोंगरी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच वेंगुर्ला वेतोबा मंदिरातील दान पेटी चोरी प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आपले आंदोलन स्तगित करावे असे पत्र पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी तालुकाध्यक्ष दादा कुबल यांना दिले आहे.
वेंगुर्ले तालुक्यात अनेक गुन्हे घडले आहेत. मात्र त्याचा तपास होत नाही. काही दिवसांपूर्वी शिरोडा मोबाईल शॉपी, आरवली वेतोबा मंदिरातील फंडपेटी, खाजणादेवी मंदिरातील चोरीचा प्रयत्न या बाबत केवळ तपास चालू आहे असे सांगितले जाते. त्यामुळे २५ जुलै पर्यंत योग्य कारवाई न झाल्यास शिरोडा पोलीस दुरक्षेत्रा समोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान पक्ष्याने दिला होता.
त्यामुळे हा अल्पवयीन आरोपी मिळताच पोलिसांनी स्वाभिमानाला पत्र पाठवून केलेली कारवाई कळविली आहे यामध्ये त्या चोरट्याकडून चोरीला गेलेले ६ मोबाईल,४ मोबाईल चार्जर, ७ पॉवर बँक कनेक्टर, १ हेडफोन, १ ब्ल्यूटूथ स्पीकर, ३ जुनी मनगटी घड्याळे, ५ चार्जर कार्ड, ३ पॉवर बँक आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच अन्य चोरीतील आरोपिंचा तपास सुरू असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल. तरी आपणही तपास कामात आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे असे नमूद केले आहे.

1

4