कणकवली नगरपंचायतीचा नव्हे,तर सत्ताधार्‍यांचा झाला पोपट…

274
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विरोधी पक्ष नगरसेवकांची टीका;आमदार,नगराध्यक्षांनी नागरिकांनाफसविण्याची लावलीय स्पर्धाच…

कणकवली, ता.२६: तब्बल ९५ लाख निधी मिळवून देण्याचे लालूच दाखवून एका भामट्याने नगरपंचायतीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी मंडळी हुशार नसल्याने त्यांचा पोपट झाला अशी टीका विरोधी पक्षाचे नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर रूपेश नार्वेकर यांनी आज केली.आत्तापर्यंत नीतेश राणे हे वेगवेगळ्या योजना आणून जनतेची फसवणूक करीत होते.आता नगराध्यक्ष देखील या स्पर्धेत उतरले आहेत.या प्रकारांमुळे जिल्हावासीयांचे मनोरंजन तर कणकवलीकरांना विकासापासून वंचित राहावे लागतेय अशीही टीका या नगरसेवकांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात विरोधी पक्ष नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन कणकवली नगरपंचायत सत्ताधार्‍यांच्या कारभाराचा पाढा वाचला. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर यांच्यासह माही परुळेकर, मेघा सावंत, सुमेधा अंधारी, मानसी मुंज यांच्यासह भूषण परुळेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.
शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक म्हणाले, आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीकरांना एप्रिल फूल करण्याचा चंग बांधला आहे. दरवर्षी एक फसवी योजना ते आणत आहेत. बोटिंग प्रकल्प, कुत्रे पकड मोहीम, कणकवलीत सीसीटीव्ही, औषध आपल्या दारी, 900 कोटींचा कचरा प्रकल्प या सार्‍या योजना फसव्याच निघाल्या आहेत.
भाजप नगरसेवक कन्हैया पारकर म्हणाले, आत्तापर्यंत आमदार नीतेश राणे जनतेला फसवत होते. या स्पर्धेत आता नगराध्यक्ष समीर नलावडे उतरले आहेत. यातून कोण जिंकतो हे आता कणकवलीकरांना बघायचे आहे. यापूर्वी कचरा प्रकल्प आणून शहरवासीयांची फसवणूक केली. आता इंटरनॅशनल पोद्दार कॉलेजच्या नावे ते फसवणूक करत आहेत. या निमार्णाधीन कॉलेज इमारतीला कुठलीही परवानगी नाही. त्यामुळे नगरपंचायतीने देखील इमारत बांधकाम पाडून टाकण्याची नोटीस बजावली आहे.
भाजप नगरसेवक रूपेश नार्वेकर म्हणाले, 95 लाखाचा सीएसआर फंड म्हणजे घाईगडबडीत लग्न केल्याचा प्रकार होता. आमंत्रणे वाटून झाली, मंडप सजला. पण ऐन वेळी नवरीच गायब झाल्याचा प्रकार कणकवलीकरांनी अनुभवला आहे. हा प्रकारच कालच आमच्या निदर्शनास आला होता. मात्र याची माहिती सत्ताधार्‍यांना मिळाल्याने त्यांनी स्वतःच खुलासा केला.

\