भुईबावडा पंचक्रोशीसह सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

222
2

वैभववाडी/प्रतिनिधी  तालुक्यात मध्यरात्री पासून पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे. शुक्रवारी सकाळी भुईबावडा पंचक्रोशीसह सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. छोटे कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
गेले दोन दिवस तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार बॕटींग केली आहे. ठिकठिकाणी भात शेतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी भुईबावडा पंचक्रोशीसह सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. ठिकठिकाणी छोटे कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

4