कर्करोगग्रस्त रुग्णासाठी दयानंद कुबल यांचा आर्थिक मदतीचा हात

2

समाजातून मदत करण्याचे आवाहन

बांदा, ता. २६ : कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ओटवणे येथील सुभद्रा जाधव यांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष दयानंद कुबल यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
ओटवणे येथील पत्रकार दीपक गावकर यांनी श्रीमती जाधव यांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी अशी मागणी दयानंद कुबल यांच्याकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेत कुबल यांनी आर्थिक मदत दिली. समाजातून या महिलेच्या वैद्यकीय उपचारांसाठी दात्यांनी मदत करावी असे आवाहन कुबल यांनी केले आहे.

1

4