पुराच्या पाण्यात गाडी घालणे आले “अंगलट”

1656
2
Google search engine
Google search engine

भेडशी दोडामार्ग मधील घटना : गोवा कळंगुट येथील चौघांना वाचविण्यास यश

दोडामार्ग / सुमित दळवी, ता. २६ : पुराच्या वाहत्या पाण्यात गाडी घालणे गोव्यातील चौघा पर्यटकांच्या अंगलट आले. मर्सिडीज बेंज गाडी पाण्यात गेल्यानंतर ती अचानक लॉक झाल्यामुळे ते गाडीतच अडकले. यावेळी गाडीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यास यश आले आहे.


हा प्रकार आज ४ वाजण्याच्या सुमारास भेडशी दामोदर मंदिरासमोर घडला. परिसरातील नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आले होते. अशा परिस्थितीत कळंगुट गोवा येथील पर्यटकांच्या दोन गाड्या तिथून जात होत्या. पुढे जाणाऱ्या अति हौशी पर्यटकांनी पाण्यातून गाडी घातली त्यांचे पाहून मागून असलेल्या मर्सिडीज चालकाने गाडी पाण्यात घातली. परंतु गाडी पाण्यात गेल्यानंतर ती ऑटोमॅटिक लाॅक झाली व तेथेच थांबली. त्यामुळे ते आडवे होऊ लागले. झालेला प्रकार लक्षात येतात पुढे गेलेल्या गाड्यातील सहकाऱ्यांनी मागे धाव घेतली व त्या चौघांना बाहेर काढले. मात्र काही वेळातच पाण्याची पातळी वाढली सद्यस्थितीत गाडी पाण्यात बुडाली आहे. यावेळी वाचण्यात आलेल्या पर्यटकांनी परमेश्वराचे आभार मानले घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.