कामाला निघालेल्या वेत्ये येथील वृद्धाचे वाटेतच निधन…

207
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. २६ : पोल्ट्रीत कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या वेत्ये येथील वृद्धाचे वाटेतच निधन झाले.ही घटना आज सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास घडली.अनंत नारायण हरमलकर (६०, रा.खांबलवाडी) असे त्यांचे नाव आहे.याबाबतची खबर त्यांचा पुतण्या किसन बाळकृष्ण हरमलकर याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,मयत हरमलकर हे सकाळी कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले.दरम्यान वाटेतच ते अत्यवस्थ अवस्थेत रस्त्यावर पडलेले काही नागरिकांच्या निदर्शनास आले.याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देत संबंधितांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

\