Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपच्या वतीने कणकवलीत कारगिल विजय दिन साजरा

भाजपच्या वतीने कणकवलीत कारगिल विजय दिन साजरा

कणकवली, ता.२६ : कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कणकवली एस.टी.स्टँड येथे भाजपच्या वतीने प्रवासी व नागरिकांना लाडु व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपा युवा नेते संदेश पारकर यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी जाग्या करत शूर जवानांना वंदन केले. भारत माता कि जय अशा घोषणा देत. कारगिल विजय दिनाचा आनंद व्दिगुणित केला.

८ मे रोजी सुरवात झालेल्या भारत पाकिस्तान मधील युद्धाचा शेवट २६ जुलै १९९९ रोजी झाला.भारताच्या शूर जवानांनी जीवाची बाजी लावत. पाकिस्तानला अस्मान दाखवले. कारगिल येथे भरतनाने विजय संपादन केल्यानंतर हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तसेच पुन्हा एकदा भारच सर्वश्रेष्ठ आहे. हे सिद्ध झाले.शूर जवांनाच्या बलिदानातून हा विजय साध्य झाला असून या विजय दिनाच्या आठवणी ताज्या राहाव्यात आणि कारगील युद्धाचे महत्व समजावे. देशाभिमान वाढावा याच उद्देशाने कारगिल विजय दिन साजरा करत असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदेश पटेल,रमेश पावसकर, नगरसेविका सुमेधा अंधारी,मेघा सावंत, बबलू सावंत, प्रसाद अंधारी,पप्पू पुजारे,पराग म्हापसेकर,विलास हडकर,सुनील गावडे, साल शिरवडेकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments