अंतिम ध्येय गाठण्यासाठी विध्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी…

2

सचिन दळवी; भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव…

वेंगुर्ले, ता. २६ : विध्यार्थ्यांनी आपल्या आई,वडील व शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळीच योग्य क्षेत्र निवडले पाहिजे.तसेच जीवनात अंतिम ध्येय गाठण्यासाठी कष्ट करण्याची मनाची तयारी ठेवावी,यासाठी स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन वेतोबा देवस्थानचे ट्रस्टी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन दळवी यांनी केले। दरम्यान यावेळी श्री.दळवी यांनी वेतोबा देवस्थान तर्फे दोडामार्ग-मांगेली येथील गरीब विध्यार्थीनी प्राजक्ता गवस हिला शिक्षणासाठी दत्तक घेऊ असे यावेळी जाहीर केले.
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या विद्यमाने वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शालांत परिक्षा २०१९ या वर्षी सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ” गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ” रेडी येथील सेंट्रल प्रायमरी स्कुलच्या सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमात
श्री. दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेतोरे हायस्कुलच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, रेडी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका दर्शना गोसावी, रेडी सेंट्रल प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका वनिता आडारकर, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागीय सीईओ राजन रेडकर, जिल्हाध्यक्ष दाजी नाईक, जेष्ठ सभासद तुकाराम मेस्त्री, कृष्णा मराठे, ललीतप्रभा नागोळकर, रोहिणी अणसुरकर, जगन्नाथ राणे, बाळा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वाती वालावलकर म्हणाल्या की, अशा सस्थांकडून होणाऱ्या सत्कारासाठी विध्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. आयुष्यात कोणताच निर्णय चुकीचा नसतो, मात्र घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करावे लागते. त्यामुळे विध्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी पंचसूत्रीचा वापर करा असे त्यांनी सांगितले. तसेच सस्थेचे अभिमान वाटावा असेच कार्य असल्याचे ते म्हणल्या.
यावेळी गोसावी यांनीही मार्गदर्शन करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर राजन रेडकर यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सस्थेच्या कार्याची माहिती दिली व हा कार्यक्रम मुलांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारण्यासाठी आयोजित केल्याचे सांगितले.
दरम्यान गुणवंत विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत राजन रेडकर, सुत्रसंचलन अनिल राणे यांनी तर आभार दाजी नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ नागोळकर, ताता नाईक, लक्ष्मीकांत कर्पे, माधव मराठे, रवी राणे, ज्ञानेश केरकर, मुरलीधर राऊळ, आबा चिपकर, दया सुर्याजी, प्रविण नागोळकरयांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

5

4