आजीचे दागिने चोरणारा नातू पोलिसांच्या ताब्यात

192
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२६ : आजोळी येऊन आजीचे दागिने लंपास करणार्‍या नातवाला कणकवली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. मोबाईल लोकेशनवरून तो फोंडाघाट परिसरात फिरत असल्याने तपासात निष्पन्न झाले होते. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतिश राजेंद्र साळसकर (वय २२, रा.चिपळूण) असे त्याचे नाव आहे.
चिपळूण फरशी तिठा येथे राहणारा आतिश साळसकर हा 5 जुलै रोजी घोणसरी-पिंपळवाडी येथील आपल्या आजीच्या घरी आला होता. पाहुणचार झाल्यानंतर त्याने आजीकडे बँक पासबुक, आधारकार्ड आदींची मागणी केली. परंतु आजीने कागदपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे आतिश याने आपली आजी शारदा मारूती साळसकर (वय ६५) हिला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. तसेच लाकडी पेटीत ठेवलेले बँक पासबुक आधार कार्ड, रेशनकार्ड याच्यासह २३ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि रोख ९ हजार ५९५ रूपये घेऊन पसार झाला होता. मोबाईल लोकेशन वरून तो आज फोंडाघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. आतिश साळसकर याला उद्या (ता.२७) कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.

\