आंबोलीच्या विकासासाठी पर्यटन महोत्सव सुरू व्हावा

2

अनील चव्हाण यांची जिल्हा परिषद अध्यक्षांकडे मागणी

आंबोली, ता. २६ : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटन, सांस्कृतिक महत्व वाढावे यासाठी आंबोली पर्यटन महोत्सवासारखा उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी तेथील सामाजिक कार्यकर्ते अनील चव्हाण यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांंच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.
त्यात आंबोलीचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आणि धबधब्याची मजा घेण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटक गर्दी करत आहेत. त्यामुळे अशा पर्यटन स्थळाचा सांस्कृतिकदृष्ट्या विकास होण्यासाठी दरवर्षी किमान तीन दिवस तरी आंबोली पर्यटन महोत्सव राबविण्यात यावा अशी मागणी श्री. चव्हाण यांनी या निवेदनात केली आहे.

2

4