आराम बसमधून गोवा बनावटीची दारू जप्त

270
2
Google search engine
Google search engine

मध्यरात्री कारवाई : 5400 रुपयांच्या दारू बाटल्या जप्त

कणकवली, ता. २६ : गोवा ते मुंबई जाणार्‍या खासगी आराम बसमधील गोवा बनावटीची दारू कणकवली पोलिसांनी पकडली. मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गावरील जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड समोर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बस चालक संतोष बाबू वरक (वय 33, रा.दुकानवाड -कुडाळ) याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बसच्या डिकीमध्ये 12 दारूच्या बाटल्या होत्या. त्यांची किंमत 5400 रूपये आहे.
नॅशनल कंपनीच्या आराम बसमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची खबर कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल (ता.25) रात्री साडे अकरा पासून जानवली येथे पोलिसांनी वाहनांची तपासणी मोहीम राबवली. यात आराम बस (जीए 07 एफ 5446) मध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या 12 बाटल्या आढळून आल्या. या दारू साठ्याबाबत पोलिसांनी बस चालक संतोष बाबू वरक याच्याशी चौकशी केल्यानंतर हा दारू साठा आपलाच असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष ही दारू जप्त गेली. आराम बस मुंबईला जाणारा असल्याने बस चालक संतोष वरक याला नोटीस बजावून तसेच चौकशी कामी पोलिसात हजर राहण्याची समज देऊन बस पुढे पाठविण्यात आली.