सिंधुदुर्गसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

2

सिंधुदुर्गनगरी, ता.२६: पुणे वेधशाळेने सिंधुदुर्गसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.शुक्रवारी उशिरा अतिवृष्टी बाबतचा ‘ऑरेंज अलर्ट’ वेधशाळेने जारी केला असून,पुढील २४ तासात तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळ पासूनच तुफान पाऊस कोसळत असून,पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.अतिवृष्टीचा इशारा देणारा ‘ऑरेंज अलर्ट’ वेधशाळेने जारी केला आहे.अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला जातो.कोकणासह मुंबई परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

14

4