कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर निर्णय विद्यमान जिल्हाप्रमुखांना विधानसभेच्या तयारी करण्याच्या सूचना
सावंतवाडी/सिध्देश सावंत ता.२७:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत पुन्हा एकदा दोन जिल्हाप्रमुख नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.तर विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना कुडाळ-मालवण विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आली आहेत.
सध्यस्थिती लक्षात घेता सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला चार तालुक्यासाठी दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी यांच्या सह सावंतवाडीच्या रुपेश राऊळ यांचे नाव चर्चेत आहे. तर मालवण, कणकवली, देवगड व वैभववाडी या भागासाठी मालवण येथील बबन शिंदे यांच्यासह शैलेश भोगले व व यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे नेमकी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व संघटना बांधणी बाबत चर्चा केली. विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे आपला मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी फिरताना दिसत नाही असे यावेळी सांगण्यात आल्याचे कळते.
यावरून आता पुन्हा एकदा दोन जिल्हाप्रमुख देण्याचा फार्मूला पक्षाकडून घेण्यात आला आहे पाच ते सहा वर्षांपूर्वी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता.दोन जिल्हा प्रमुख नेमण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
याची माहिती शिवसेनेत काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली शिवसेनेत व्यक्तीपेक्षा संघटनेला महत्व आहे. त्यामुळे आगामी काळात संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. आमच्या काही मागण्या होत्या त्या आम्ही मांडल्या त्यात भविष्यात संघटना वाढावी या दृष्टीने दोन जिल्हाप्रमुख द्यावेत अशी मागणी केली त्यानुसार दोन्हीकडे जिल्हाप्रमुख देण्याचे मान्य करण्यात आले आहे. काही दिवसात ही निवड होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. तर वैभव नाईक यांना आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे