वाडोस जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय मोफत वह्या वाटप

302
2

कुडाळ ता,२७: कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून मोफत वह्या वाटप करण्यात आले. शिक्षण घेत असलेल्या व गरजू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवसेनेकडून मोफत वह्या वाटप करण्यात आले.
शैक्षणिक दृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे व सामाजिक बांधिलकी जपणारा कौतुकास्पद व
शिवसेनेचे अनोखा उपक्रम आहे.असे प्रतिपादन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत सावंत सर यांनी केले.तसेच महाविद्यालयातील कर्मचारी श्री राठये सर राऊळ सर ,सावन मॅडम ,आदी उपस्थित होते. शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, विभागीय अध्यक्ष राजन बोबाटे, रा मा धुरी, संतोष बांदेकर, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

4