रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचा उपक्रम
वेंगुर्ले. ता,२७: रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा सिंधदुर्ग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुक्यातील निवती गावामध्ये मच्छिमार बांधवांना बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण देण्यात आले.
निवती मधील या कार्यक्रमामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आपत्त्ती व्यवस्थापन प्रशिक्षक श्री. प्रवीण सुलोकर यांनी मच्छिमारांना समुद्रामध्ये बोटीवर असताना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर प्राथमिक सीपीआर(cpr ) पद्धतीचा वापर करून बेसिक लाईफ सपोर्टद्वारे व्यक्तीला कसे वाचवता येऊ शकते याची माहिती प्रात्यक्षिकासह मच्छिमारांना देण्यात आली. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये बुडालेल्या व्यक्तीला, विजेचा झटका लागलेल्या व्यक्तीला बेसिक लाईफ सपोर्टद्वारे कसे वाचवता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण मच्छिमारांना देण्यात आले. याशिवाय सर्पदंश व बचाव कार्य कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक मच्छिमारांना श्री. प्रवीण सुलोकर यांनी दिले. कार्यक्रमासाठी मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम गावाधील तरुण मच्छिमारांसाठी घेण्यात यावे अशी विनंती मच्छिमारांच्यावतीने करण्यात आली. यावेळेस रिलायन्स फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशनचे
मच्छिमारांसाठी असलेल्या सागरी हवामानाच्या ध्वनी संदेश , हेल्पलाईन सेवेची व फाउंडेशनची माहिती दिली. कार्यक्रमासाठी निवती गावाच्या सरपंच श्रीमती. भारती धुरी यांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन निवती गावाचे पांडुरंग वासुदेव सारंग यांनी केले. कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्त्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री. दीपक केकाण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थपन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे यांनी केले.