आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना चांगली सुविधा द्या_

143
2
Google search engine
Google search engine

_संदिप मेस्त्री; वैभववाडी सेतू सुविधा समन्वयकांना सूचना_

वैभववाडी.ता,२७: आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थीना चांगली सुविधा द्या. नोंदणीसाठी आलेल्या महिला लाभार्थांना ताटळत ठेवू नका. अशा सूचना युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी वैभववाडी सेतू सुविधा केंद्र समन्वयक श्री शैलेश सुर्वे यांना दिल्या. तसेच यावेळी तहसिलदार रामदास झळके यांची युवक स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. तहसिल कार्यालयातील सुलभ शौचालय व स्वच्छता गृहामध्ये दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीचा आजार फैलावू शकतो. त्याची तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत योग्य त्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. व यापुढे दक्षता घेतली जाईल असे तहसिलदार झळके यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, वैभववाडी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, जिल्हा उपाध्यक्ष नासीर काझी, युवक अध्यक्ष हुसेन लांजेकर, बाळा हरयाण, कणकवली विधानसभा अध्यक्ष अमित साटम, उपाध्यक्ष नितिन पाडावे, गणेश तळगावकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, मा. नगरसेवक संताजी रावराणे, उदय पांचाळ, रज्जब रमदुल, नवलराज काळे, अक्षय पाटील, राजेश गजोबार, रोहीत रावराणे, आप्पा मुद्रस, मंगेश कोलते, शांतेश रावराणे, आशिष रावराणे व स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो – वैभववाडी तहसीलदार श्री झळके यांना सुलभ शौचालयाच्या स्वच्छतेबाबतचे निवेदन देतांना युवक स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते