विद्या मंदिर कुंभवडे शाळेत वृक्षारोपण

318
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुंबईस्थित तरूणांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना वृक्ष भेट

वैभववाडी ता.२७:निसर्गाने आपल्याला स्वच्छ हवा, विविध प्रकारची स्वादिष्ट फळे व बरेच काही भरभरून दिले. परंतु दिलेल्या नैसर्गिक अनमोल ठेव्याचे रक्षण करण्याऐवजी आपण पर्यावरणाचा नाश करत आहोत. यामुळे भयंकर दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागत आहे. या दुष्ट चक्रातून पर्यावरणाचे रक्षण करायचे असल्यास मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून कुंभवडे येथील मुंबईस्थित तरुणांनी विद्या मंदिर कुंभवडे नं १ या प्रशालेत एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवित विद्यार्थ्यांना वृक्ष भेट दिली.
‘एकतरी झाड लावा’! ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. तसेच जे विद्यार्थी झाडांची चांगली निगा राखेल, त्याला पुढील वर्षी बक्षिसही दिले जाणार आहे. या उपक्रमात गावातील स्थानिक आणि शाळेतील शिक्षकांनी सहभागी होवून वृक्षारोपण केले.

\