Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामठ येथे वेंगुर्ले भाजपाच्यावतीने महिलांसाठी मोफत फॅशन डिझाईन कोर्स

मठ येथे वेंगुर्ले भाजपाच्यावतीने महिलांसाठी मोफत फॅशन डिझाईन कोर्स

वेंगुर्ला, ता. २७ : भारतीय जनता पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले तालुक्यात जि. प. मतदार संघ निहाय महीलांसाठी मोफत फॅशन डिझाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आडेली जि. प. मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत स्वयंभू मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती स्मिता दामले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, नगरसेवक सुहास गवंडळकर, नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा व्रुंदा गवंडळकर, उमा फॅशन इनस्टीस्टुसच्या सौ. उमा म्हारदळकर, प्राची मोबारकर, ग्रा. प. सदस्या कविता मठकर, ग्रा. प. सदस्या लक्ष्मी परब, ग्रा. प. सदस्या कविता नाईक, रविंद्र खानोलकर, प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र खानोलकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments