तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…
सावंतवाडी ता.२७: सर्वसामान्यांना गोरगरिबांना मदतीचा हात देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस येथील तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी येथील तालुका शाखेकडे ज्येष्ठ शिवसैनिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
येथील तालुका शिवसेनेच्या वतीने दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.यात नगरसेवकांच्या वतीने नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम,कोलगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वृक्षारोपण तर महिला आघाडीच्या वतीने येथील अंकुर निवारा केंद्रातील महिलांना फळ वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोगो,भारती मोरे,अपर्णा कोठावळे,श्रुतिका दळवी,रश्मी माळवदे,पंचायत समिती सदस्य मेघशाम काजरेकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार,शहर प्रमुख बाबू कुडतरकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.